Atal Bihari Vajpayee: राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:20 AM2022-12-27T00:20:08+5:302022-12-27T00:20:43+5:30

महानाट्यात १७५ पेक्षा जास्त कलावंतांचा सहभाग

Rashtrapurush Atal drama based on fprmer Indian PM Atal Bihari Vajpayee will be presented in Nagpur on Tuesday | Atal Bihari Vajpayee: राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण

Atal Bihari Vajpayee: राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण

googlenewsNext

Atal Bihari Vajpayee | देशाचे माजी पंतप्रधान, बहुआयामी व्यक्तिमत्व स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे 'राष्ट्रपुरुष अटल' हे महानाट्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवारी, २७ डिसेंबर रोजी सादर केले जाणार आहे. हे महानाट्य नागपूरच्या स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रयास बहुउद्देशीय संस्थेद्वारा निर्मित या महानाट्यातून १७५ पेक्षा जास्त कलावंत सहभागी होणार आहेत.

महानाट्याच्या या प्रयोगाचे  उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रयोगास राज्य मंत्रिमंडळाचे सन्माननीय सदस्य,  विधान सभा / परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील रसिकांनी या महानाट्यास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Rashtrapurush Atal drama based on fprmer Indian PM Atal Bihari Vajpayee will be presented in Nagpur on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.