व्यवस्थापक करण्याचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:00 IST2021-03-17T23:59:00+5:302021-03-18T00:00:15+5:30

Rape , crime news व्यवस्थापक करण्याचे आश्वासन देऊन घटस्फोटित महिलेचे दीड वर्षे शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape by showing the lure of being a manager | व्यवस्थापक करण्याचे आमिष दाखवून अत्याचार

व्यवस्थापक करण्याचे आमिष दाखवून अत्याचार

ठळक मुद्देगर्भवती होताच नाते दुरावले : आरोपी युवकाला अटक

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : व्यवस्थापक करण्याचे आश्वासन देऊन घटस्फोटित महिलेचे दीड वर्षे शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

राहुल अर्जुन वैद्य (३२, रा. हजारी पहाड) असे आरोपीचे नाव आहे. राहुलचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचे गड्डी गोदाम येथे कार्यालय आहे. पीडित २९ वर्षाची महिला घटस्फोटित आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, तिची मैत्रीण राहुलकडे काम करीत होती. मैत्रिणीच्या माध्यमातून तिची राहुलशी मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. राहुलने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्याने वर्षभरापूर्वी तिच्याशी लग्नही केले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिला अजनीत राहते. राहुल तिला १८ ऑगस्ट २०१९ रोजी अजनीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर टी-पॉईंट येथे घेऊन गेला. या प्रवासात त्याने कारमध्येच तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केला. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यामुळे ती गर्भवती झाली. पीडिताने याबाबत राहुलला माहिती दिली असता, त्याने आपण विवाहित असल्याचे सांगितले. पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती देऊन त्याने पीडिताला पत्नीसारखे ठेवण्यास नकार दिला. गर्भवती झाल्यानंतर पीडिता ही राहुलला त्याच्यासोबत ठेवण्यासाठी दबाव टाकत होती. त्याने नकार दिल्यामुळे तिने प्रतापनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार आणि अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करून राहुलला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत. त्यांनी राहुलला न्यायालयासमोर हजर करून १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. राहुल अत्याचार केल्याचा इन्कार करीत आहे.

Web Title: Rape by showing the lure of being a manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.