लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2023 14:50 IST2023-06-22T14:49:36+5:302023-06-22T14:50:59+5:30

वर्षभर शरीरसंबंध ठेऊन लग्नास नकार

Rape of minor girl by luring marriage, accused arrested | लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

नागपूर : लग्नाचे आमीष दाखवून १७ वर्षाच्या मुलीसोबत वर्षभर शरीरसंबंध ठेऊन लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

अखिल राजु नागवंशी (वय २०, रा. जरीपटका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अखिल एका बेकरीत शेफचे काम करतो. वर्ष २०२१ मध्ये आरोपी अखिलची जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तृषालीसोबत (बदललेले नाव) फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून ओळख झाली.

तृषाली १७ वर्षांची असून सध्या ती बारावी उत्तीर्ण झाली आहे. त्यांच्यात नियमित बोलणे सुरु झाले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. १२ ऑगस्ट २०२२ ते १३ मे २०२३ या काळात आरोपी अखिलने तृषालीला लग्नाचे आमीष दाखवून आपल्या घरी नेऊन जबरदस्ती तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे तृषालीने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. जरीपटका ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या काळे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (एन), सहकलम ४, ६ पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

Web Title: Rape of minor girl by luring marriage, accused arrested