शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल

By जितेंद्र ढवळे | Published: April 04, 2024 9:31 PM

Ramtek Loksabha Election: लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले असा आरोप रश्मी बर्वेंनी केला.

नागपूर - काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. यानंतर महायुती आणि काँग्रेसने गुरुवारी पत्रपरिषद घेत एकमेकावर आरोप-प्रत्योराप केले. बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र कायद्यानुसार रद्द झाल्याचे रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले तर न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याने सत्याचा विजय झाल्याचे सांगत रश्मी बर्वे यांनी भाजपवर तोफ डागली.

काँग्रेस मतदारांची दिशाभूल करतेय, आशिष जयस्वाल यांचा आरोपरश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात किंवा त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या प्रक्रियेत भाजप किंवा सेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावा आ. ॲड. आशिष जयस्वाल यांनी केला. बर्वे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून जातवैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे ते प्रमाणपत्र अवैध असल्यासंदर्भात कोराडीचे सुनील साळवे आणि पारशिवनीच्या वैशाली देवीया यांनी जात पडताळणी समितीकडे पुरावे सादर करीत तक्रार दाखल केली होती. मुळात हा वाद साळवे आणि बर्वे यांच्यातील आहे. मात्र, काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात रामटेक मतदारसंघात संभ्रम पसरविला जात आहे.

बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध की अवैध, ते ठरविण्याच्या अधिकार हा कायद्यानुसार जातपडताळणी समितीचा आहे. समितीने तो अवैध ठरविला आहे. समितीच्या निर्णयाचा आधार घेत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला होता. याच्याशी रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे किंवा महायुतीचा काहीही संबंध नाही. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते.

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा जागर करणारे मला का घाबरतात?‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा जागर करणारे भाजपचे नेते मला इतके का घाबरतात, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केला. आपला न्यायव्यवस्थेवर आजही विश्वास आहे. मात्र, सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून दोन महिन्यांपासून माझा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप बर्वे यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले. त्याच्या आधार घेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द केला. मात्र, आज न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्याचा विजय झाला. मी लोकांत जाऊन काम केले. त्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आडकाठी आणण्यात आली. आता माझे पती श्यामकुमार बर्वे येथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आमची सत्यासाठीची लढाई सुरूच राहील. मात्र, जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेवर आघात झाले, तेव्हा सत्याचाच विजय झाला आहे. महाभारत, रामायण याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे बर्वे म्हणाल्या. पत्रपरिषदेला काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे, ॲड. शैलेश नारनवरे उपस्थित होते.

टॅग्स :ramtek-pcरामटेकcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४