शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासन सज्ज : क्वारंटाईनसाठी अजनी परिसरात १५० खाटा तयार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 21:02 IST

कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी अजनी परिसरात १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअजनी ट्रेनिंग सेंटर, आरपीएफ बरॅक, सी अ‍ॅन्ड डब्ल्यू परिसरात व्यवस्था

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी अजनी परिसरात १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.उपराजधानीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमितपणे विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन रुग्णांची संख्या वाढल्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तयारी केली आहे. रेल्वे प्रशासनाने मागील महिन्यात रेल्वे रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी ४० खाटांचे दोन वॉर्ड तयार केले आहेत. त्यानंतर रविवारपासून अजनी रेल्वे परिसरातील विद्युत लोकोशेड, अजनी बेसिक ट्रेनिंग सेंटर, सी अ‍ॅन्ड डब्ल्यू रेस्ट हाऊस, आरपीएफ बरॅक, अजनी वर्कशॉप १५० खाटांची तयारी केली आहे. रेल्वेने येथील परिसर निर्जंतुक करून संशयित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी प्रशासनाला या खाटांची गरज भासल्यास रेल्वे प्रशासन या खाटा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देणार आहे.क्वारंटाईन सुविधेसाठी रेल्वे सज्ज‘मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने क्वारंटाईनला ठेवण्यासाठी १५० खाटांची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासनाला कधीही गरज भासल्यास या खाटा उपलब्ध करून देण्यात येतील.’एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल