शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढ होणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

By आनंद डेकाटे | Updated: February 27, 2025 22:08 IST

Nagpur News: विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरूवारी येथे केली.

- आनंद डेकाटे नागपूर - विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरूवारी येथे केली.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्व संध्येला धरमपेठ येथील प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.  प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमच्या संचालक डॉ. सीमा उबाळे, उल्हास औरंगाबादकर, हेमंत चाफले यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री भोयर म्हणाले, विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५ हजार रुपयांवरून ५१ हजार रुपये करण्याचा निर्णय विभागाच्या विचाराधीन असून लवकरच तो जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याच्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.डॉ. सीमा उबाळे यांनी संचालन केले तर हेमंत चाफले यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री भोयर यांनी या ठिकाणी आयोजित विज्ञान प्रदर्शनीतील मांडण्यात आलेल्या विविध प्रयोगांचे निरीक्षण केले. मुंबई येथील डॉ. होमीभाभा विज्ञान केंद्राच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत सरस कामगिरी करणाऱ्या आफिया आफताब, कीर्ती येणुरकर आणि आदित्य रंजन या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री भोयर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरnagpurनागपूर