शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम फंडवरील याचिकेमागे प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:15 IST

नागपूर : पीएम केअर फंडवर विविध आधारहीन आक्षेप घेऊन याचिका दाखल करण्यामागे प्रसिद्धी मिळवणे हा एकमेव उद्देश आहे असा ...

नागपूर : पीएम केअर फंडवर विविध आधारहीन आक्षेप घेऊन याचिका दाखल करण्यामागे प्रसिद्धी मिळवणे हा एकमेव उद्देश आहे असा गंभीर आरोप केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. तसेच, संबंधित पुनर्विचार याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावण्याची विनंती केली.

पंतप्रधान कार्यालयातील अवर सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करून याचिकाकर्ते अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांच्या उद्देशावर आक्षेप घेतला. वाघमारे यांची पीएम केअर फंडसंदर्भात विविध चार मागण्या करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने २७ ऑगस्ट २०२० रोजी फेटाळून लावली. त्या निर्णयावर पुनर्विचार होण्यासाठी वाघमारे यांनी नवीन याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने या याचिकेतील मुद्देही निरर्थक व निराधार असल्याचा दावा केला. वाघमारे यांचा उद्देश प्रामाणिक नाही. त्यांनी जनहिताच्या आडून पुन्हा चांगली प्रसिद्धी मिळवण्याकरिता पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. पीएम केअर्स फंड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून त्याची नोंदणी कायदा-१९०८ अंतर्गत नोंदणी झाली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कॅगद्वारे ऑडिट करण्याची गरज नाही. याशिवाय फंडचे २०१९-२० मधील ऑडिट स्टेटमेंट वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असताना याचिकेमध्ये याविषयी अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता याचिका आधारहीन ठरते असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले.

-------------

याचिकेवर निर्णय राखून

पुनर्विचार याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. पीएम केअर फंडमध्ये किती रक्कम जमा झाली आणि आतापर्यंत फंडमधील रकमेचा कशाकरिता उपयोग करण्यात आला याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, पीएम केअर फंडच्या विश्वस्त मंडळातील तीन रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, त्यापैकी दोन विश्वस्त विरोधी पक्षांमधून निवडण्यात यावे आणि फंडच्या लेखा परीक्षणाकरिता नवी दिल्ली येथील मे. सार्क असोसिएट्सची नियुक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्ते वाघमारे यांचे म्हणणे आहे.