शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वर-नरसाळ््यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा

By admin | Updated: April 17, 2016 02:57 IST

शहरात नव्याने समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील नागरिकांना रस्ते, नाली, पथदिवे,

नागपूर : शहरात नव्याने समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील नागरिकांना रस्ते, नाली, पथदिवे, पाणीपुरवठा, सिवर लाईन या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. या भागातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक आयोजित केली होती. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंताा उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक आदी उपस्थित होते.मालमत्ता कर व कर आकारणी, पाणीपुरवठा योजना, पाण्याची पाईपलाईन नसलेल्या भागात टँकरव्दारे पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, या भागातील रस्त्यांच्या कामाला मंजुरी देताना येणाऱ्या अडचणी सोडवा, या गावांसाठी नवीन जलकुंभ उभारा, भागात नवीन गडर लाईनचा प्रस्ताव तयार करा, दोन्ही गावातील मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे लावणे, नाली व नाल्यांचे बांधकाम तातडीने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या गावांतील साफसफाईसाठी देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे आॅडिट करून सर्व परिसराची दररोज स्वच्छता करा, कर आकारणी व कर वसुली केंद्रात नागरिकांसाठी सुविधा निर्माण करा. हुडकेश्वरसाठी १४ कोटी तर नरसाळा गावांसाठी १० कोटीचे विशेष अनुदान उपलब्ध केले आहे. यातून नवीन रस्ते, नाली व नाला बांधकाम करावयाचे आहे. रस्त्यांचा नवीन आराखडा तयार करा, रस्त्याच्या एका बाजूला फूटपाथ निर्माण करा, या भागात १०० बोअरवलेचा प्रस्ताव आहे. ही संख्या ११० पर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अजय बोढारे, डी.डी.सोनटक्के, भगवान मेंढे, मनोज लक्षणे, मंजू वाजूरकर, कमल हातीबेड यांच्यासह महावितरण, पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अचानक शटडाऊ नवर नाराजी पाटबंधारे विभागाने महापालिकेला विश्वासात न घेता ८ ते १० एप्रिलदरम्यान अचानक शटडाऊ न घेतला. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी यासारखे महत्त्वाचे सण असताना पाणीपुरवठा बाधित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यावर प्रवीण दटके यांनी नाराजी व्यक्त क रुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकाऱ्यांनी महापौर व आयुक्तांसोबतच चर्चा केल्यानंतरच पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.