दवाखान्यात डोळे तपासायला गेले अन् इकडे चोरट्यांनी घर फोडले

By योगेश पांडे | Updated: August 22, 2023 12:47 IST2023-08-22T12:46:50+5:302023-08-22T12:47:52+5:30

अज्ञात आरोपींंविरोधात गुन्हा दाखल

Property worth 1.56 lakhs was stolen by breaking into a house | दवाखान्यात डोळे तपासायला गेले अन् इकडे चोरट्यांनी घर फोडले

दवाखान्यात डोळे तपासायला गेले अन् इकडे चोरट्यांनी घर फोडले

नागपूर : पत्नीला सोबत घेऊन दवाखान्यात डोळे तपासायला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे चोरट्यांनी घर फोडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अरुणनयन श्रीगोविंद तिवारी (७४, प्रिया अपार्टमेंट, पांडे ले आऊट) असे संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी ते घराला कुलूप लावून पत्नीसह घराजवळील एका इस्पितळात डोळे तपासण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा १.५६ लाखांचा ऐवज चोरून नेला. घरी परत आल्यावर तिवारी यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींंविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Property worth 1.56 lakhs was stolen by breaking into a house