शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांनी राजकारणापेक्षा संशोधनाकडे लक्ष द्यावे

By admin | Updated: July 12, 2015 03:13 IST

विदर्भात अनेक नवनवीन उद्योग येत असताना त्यांना पूरक असे अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपलब्ध नाहीत ही खंत आहे.

नितीन गडकरी : शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कारनागपूर : विदर्भात अनेक नवनवीन उद्योग येत असताना त्यांना पूरक असे अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपलब्ध नाहीत ही खंत आहे. परंतु संशोधनातदेखील विद्यापीठ मागेच आहे. प्राध्यापक मंडळी आता निवडणुकांच्या तयारीत व्यस्त झाली आहेत. त्यांनी यापेक्षा संशोधनाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अरुणकुमार शेळके, आमदार अनिल सोले, संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ.सुरेश ठाकरे, ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते बारावी, विविध प्रवेशपरीक्षा तसेच क्रीडाक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाचा उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी समन्वयच नसल्याचे दिसून येते. विद्यापीठाच्या अभ्यासमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तेथे प्राध्यापकच जास्त प्रमाणात असतात. यातूनच ‘व्हिजन’चा अभाव दिसून येतो असे नितीन गडकरी म्हणाले. एखाद्या परीक्षेतील यश हे अंतिम ध्येय असू नये. नोकरीपेक्षा विद्यार्थ्यांनी उद्योगाला प्राधान्य देण्याचा काळ आला आहे असा सल्लादेखील गडकरी यांनी यावेळी दिला. अ‍ॅड.अरुण शेळके यांनीदेखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी व महाविद्यालयांच्या बौद्धिक संपदेचे मोजमाप व्हायला हवे असे ते म्हणाले. डॉ.बुरघाटे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीवर भाष्य केले. यावेळी संस्थेचे विविध पदाधिकारी, आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कांचन दाते यांनी संचालन केले तर दीपक कडू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)