शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कैदीही करणार ‘एटीएम’ने ‘पेमेंट’

By admin | Updated: January 28, 2016 03:13 IST

तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे.

एसबीआयचे बनले खातेधारक : नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगातून पायलट प्रोजेक्टला सुरुवातनागपूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे. बुधवारी तुरुंग परिसरात आयोजित एका कार्यक्रमात कैद्यांना पासबुक आणि एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टला राज्यातील नऊ केंद्रीय तुरुंगात लागू करण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) डॉ. बी.के. उपाध्याय हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अधीक्षक योगेश देसाई, एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक बी. शंकर आणि सहायक महाव्यवस्थापक आलोक सिन्हा प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत असलेले जवळपास ८०० कैदी आहेत. तुरुंगात या कैद्यांकडून मजुरी करवून घेतली जाते. त्या मोबदल्यात त्यांना दिवसाप्रमाणे मजुरीसुद्धा दिली जाते; ती ४५ रुपये, ५० रुपये आणि ५५ रुपये अशी असते. ही मजुरीची रक्कम त्यांच्या नावाने तुरुंगातच जमा होत असते. त्यांना परिवाराकडूनसुद्धा एक ठराविक आर्थिक मदत मिळत असते. कैद्यांना कॅन्टीनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंची विक्री केली जाते. त्यांना एका महिन्यात दोन हजार रुपये खरेदी करण्याचे अधिकार असतात. है पैसे कैद्यांच्या नावाने जमा असलेल्या निधीमधून वसूल केले जाते. या कामासाठी कैद्यांचा लेखाजोखा सांभाळून ठेवण्यात आणि इतर कामांमध्ये खूप वेळ खर्ची पडतो. त्यामुळे डॉ. उपाध्याय यांनी महासंचालकपद स्वीकरताच कैद्यांना एसबीआयचे खातेधारक करण्याची योजना आखली, त्यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ही योजना सुरू केली. बुधवारी कैद्यांना पासबुकसह एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. यानंतर मजुरीची रक्कम कैद्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कैद्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मनीआॅर्डर पाठविण्याऐवजी थेट बचत खात्यात पैसे जमा करता येतील. तुरुंगातील कॅन्टीनमधून काही खरेदी केल्यास कैदी एटीएमद्वारे पेमेंट करतील. यासाठी कॅन्टीनमध्ये ‘स्वॅपिंग मशीन’ लावण्यात आली आहे. सध्या दोन हजार रुपयांची मर्यादा आहे. त्याला अडीच हजार रुपयापर्यंत वाढविण्यात येत आहे. कैद्यांना एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर मात्र कैदी आपल्या पत्त्याचे दस्ताऐवज सादर करून हे खाते नियमित करू शकतील. सध्या १५० कैद्यांना पासबुक व एटीएम कार्ड देण्यात आले आहेत. राज्यात नऊ केंद्रीय तुरुंग आहेत. यात १० हजारावर शिक्षा भोगत असलेले कैदी आहेत. नागपुरातील यशानंतर सर्वांनाच यात सामील केले जाईल. (प्रतिनिधी)