शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैदी प ळा ला

By admin | Updated: June 16, 2015 02:34 IST

दुपारी २.३० वाजता धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोयर बावाच्या पलायनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण

सर्वत्र नाकाबंदीदुपारी २.३० वाजता धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोयर बावाच्या पलायनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यात अलर्ट देण्यात आला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले. भोयर बावाचे छायाचित्र देऊन साऱ्यांना त्याला पकडण्याचे सूचनावजा आदेश देण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर आरोपी मिळाला नव्हता. जन्मठेपेचा कैदी : कारागृह प्रशासनाला हादरानागपूर : मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला एक कैदी सोमवारी सकाळी कारागृहाच्या बाहेरून पळून गेला. पुरुषोत्तम भोयर (वय ३९) असे त्या कैद्याचे नाव आहे. अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या ‘जेल ब्रेक’चा थरार ताजाच असताना घडलेल्या या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला भोयर मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. १२ वर्षांपूर्वी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातीलच खुल्या कारागृहात ठेवण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तो कारागृहाबाहेरच्या परिसरात साफसफाई करून अन्य कैद्यांकडूनही कामे करून घ्यायचा. बाहेर काढण्यात येणाऱ्या कैद्यांवर लक्ष ठेवण्याचीही त्याच्यावर जबाबदारी होती. भोयर ‘बावा’ म्हणून तो कारागृहात ओळखला जात होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कारागृहात भत्ता घेतल्यानंतर इतर काही कैद्यांसोबत तो बाहेर आला. सोबत काही कर्मचारीही होते. सकाळी १०च्या सुमारास काम आटोपल्याने कैद्यांना आतमध्ये नेण्याची तयारी झाली. भोयर बावा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. तो पळून गेल्याचे स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांना माहिती दिली. भोयर बावा पळून गेल्याची वार्ता कारागृह प्रशासनाला हादरवून सोडणारी ठरली. इकडे तिकडे शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना कळविण्यात आले. देसाई यांनी तातडीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्रित करून भोयर बावाची माहिती घेतली. धंतोली पोलिसांनाही कळविण्यात आले. अडीच महिन्यात दुसरा धक्का मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला अडीच महिन्यात मिळालेला हा दुसरा धक्का आहे. ३१ मार्चच्या पहाटे कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी तिघांना पकडले. मुख्य सूत्रधार सत्येंद्र गुप्ता आणि बिशनसिंग उके अद्याप हाती लागलेले नाही. या प्रकरणाने कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक वैभव कांबळे आणि चार तुरुंगाधिकाऱ्यांसह एकूण १० जणांना निलंबित करण्यात आले तर, एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. यानंतर येथे कारागृह अधीक्षकांसह नवीन १७ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले. नवीन अधिकारी कारागृहातील व्यवस्था नीट करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही घटना घडल्याने त्यांनाही हादरा बसला आहे. विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी असाच मुक्तवावर (बावा) असलेला सूरज अरखेल नावाचा कैदी कारागृहाच्या बाहेरून अशाच प्रकारे पळून गेला होता.