शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:50 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होत आहे.

ठळक मुद्देसुरेश भट सभागृह व ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राचे करणार लोकार्पण : दीक्षाभूमी आणि रामटेकमधील श्री शांतिनाथ जैन मंदिरालाही देणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होत आहे. राष्ट्रपती एक दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमात दीक्षाभूमी, रामटेक येथील श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट, ड्रॅगन पॅलेस येथील विपश्यना मेडिटेशन सेंटर तसेच सुरेश भट नाट्यगृहाचे लोकार्पण करणार आहेत.राष्ट्रपती रामनाथ कोविंद विमानतळावर स्वागताचा स्वीकार करून दीक्षाभूमीसाठी प्रयाण करतील. सकाळी १०.२५ ते १०.४५ वाजेपर्यंत ते दीक्षाभूमीला भेट देऊन दर्शन करतील. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ते रामटेकसाठी प्रयाण करतील. रामटेक येथे सकाळी ११.५५ वाजता आगमन होईल. सकाळी ११.५५ ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते रामटेक येथून दुपारी १२.१० वाजता कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरसाठी प्रयाण करतील. दुपारी १२.५५ ते १.४० वाजेपर्यंत विपश्यना मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण, विशेष बुद्ध वंदना तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या लोकार्पण समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील.दुपारी १.४० वाजता येथून राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी २.१० वाजता राजभवन येथे त्यांचे आगमन होईल. तेथे दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील.नागपूर महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या रेशीमबाग येथील सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती यांचे दुपारी ४.१५ वाजता आगमन होईल. दुपारी ४.१५ ते ५ वाजेपर्यंत सुरेश भट नाट्य सभागृहाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून विमानतळाकडे प्रयाण करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूर विमानतळ येथून सायंकाळी ५.२५ वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी प्रयाण होईल.

असा आहे दौरासकाळी १० वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळसकाळी १०.२५ ते १०.४५ वाजता : दीक्षाभूमीला भेटसकाळी ११.५५ ते १२.१० वाजता : श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेटदुपारी १२.५५ ते १.४० वाजता : कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटनदुपारी १.४० वाजता : राजभवनाकडे प्रयाणदुपारी २.१० वाजता : राजभवन येथे आगमनदुपारी ४ वाजेपर्यंत : राखीव वेळसायंकाळी ४.१५ वाजता : नागपूर महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटनसायंकाळी ५ वाजता : विमानतळाकडे प्रयाणसायंकाळी ५.२५ वाजता : नागपूर विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीसाठी प्रयाण