National Inter-religious conference in Nagpur: “तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक”: प्रल्हाद वामनराव पै

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:48 AM2021-10-24T11:48:49+5:302021-10-24T11:50:04+5:30

National Inter-religious conference in Nagpur: तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे असून, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक असल्याचे मत प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. 

pralhad wamanrao pai says young generation needs super positivity to get out of depression | National Inter-religious conference in Nagpur: “तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक”: प्रल्हाद वामनराव पै

National Inter-religious conference in Nagpur: “तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक”: प्रल्हाद वामनराव पै

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यकसर्वांचा विचार करायला शिकायला हवेआपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल

नागपूर: कोरोना संकट काळापासून तरुण वर्गात निराशा, नैराश्य यात वाढ झालेली दिसते. डिप्रेशनमुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे गेलेले दिसतात. यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या सुरुवातीला जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै (Pralhad Wamanrao Pai) प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे असून, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक असल्याचे मत प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, आताच्या काळात तीव्र स्पर्धा आहे. तरुणाला या स्पर्धेला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. सततची चिंता, काळजी, भविष्याबद्दलची अनिश्चितता या सर्व गोष्टींमुळे तरुण वर्गात असुरक्षितता वाढली आहे. यांसारख्या कारणांमुळे मनात नकारात्मक विचार येतात. याचे सातत्या वाढले की नकारात्मक विचारांची एक साखळी सुरू होते आणि मग तरुण डिप्रेशनमध्ये जातात. यातून तरुणांना बाहेर काढण्याची गरज आहे. अशा तरुणांमध्ये सकारात्मकता आणण्याची गरज आहे. यासाठीच जीवनविद्या सुपर पॉझिटिव्हिटी शिकवते, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

सर्वांचा विचार करायला शिकायला हवे

जीवनविद्येच्या सुपर पॉझिटिव्हिटीचे तत्त्वज्ञान म्हणजे केवळ तुम्ही स्वतःचा विचार करू नका. केवळ स्वतःचा विचार केल्याने काळजी, नकारात्मकता सुरू होते. यासाठी सर्वांचा विचार करायला शिकायला हवे. सर्वांच्या भल्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये आपलेही भले आहे. हेच आम्ही तरुणांना शिकवतो. हे शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आहे. सर्वांचा विचार केला, सर्वांचे भले होऊ दे, असा विचार केलात तर आपोआप तुमचेही भले होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही नेहमी तरुणांना सांगतो की, सर्वांचा विचार करायला सुरुवात कराल, तेव्हा नकारात्मकता कधी येणार नाही, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी सांगितले. 

आपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल

केवळ माझा किंवा स्वतःचा विचार कोणीही करू शकतो. प्रत्येक जण स्वतःचा विचार करत असतो. मी मोठा होईन. पण केवळ मी मोठा होण्यापेक्षा सर्वजण कसे मोठे होतील. याचा केवळ विचार किंवा इच्छा केली, तरी आपल्यासह अन्यही मोठे होऊ शकतील. जीवन विद्येचे विचार सर्वांचे भले होऊ दे, सर्वांचे कल्याण होऊ दे, ही सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना सर्वांनी दररोज म्हटली, जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा म्हटली, तर आपल्यात सकारात्मकता येईल आणि ती आपल्याला आपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नागपूर ‘ लोकमत ’ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे.
 

Web Title: pralhad wamanrao pai says young generation needs super positivity to get out of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.