शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप गाडगेचा जामीन फेटाळला

By admin | Updated: May 19, 2016 02:54 IST

भारतीय विद्या भवन्समध्ये चार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या शिफारशीसाठी बनावट लेटरपॅडचा वापर करून फसवेगिरी केल्याचा संशय असल्याने प्रदीप वसंत गाडगे याने ....

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या शिफारशीसाठी बनावट लेटरपॅडचा वापर केल्याचा संशयनागपूर : भारतीय विद्या भवन्समध्ये चार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या शिफारशीसाठी बनावट लेटरपॅडचा वापर करून फसवेगिरी केल्याचा संशय असल्याने प्रदीप वसंत गाडगे याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सिव्हिल लाईन्स येथील भारतीय विद्या भवन्स या संस्थेचे विजय योगराज ठाकरे हे रजिस्ट्रार आहेत. २०१६-१७ या वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध चार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता ‘महाराष्ट्र स्टेट जर्नालिस्ट युनियन फाऊंडर अ‍ॅन्ड प्रेसिडेंट प्रदीप गाडगे, डिव्हिजनल आॅफिस राजे रघुजीनगर सक्करदरा’अशा लेटरपॅडवर शिफारससंदर्भातील मजकूर टंकलिखित करून पाठविण्यात आल्याचे तसेच भवन्सशी संलग्न असलेल्या ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली’च्या अध्यक्षाच्या नावाचे टंकलिखित शिफारसपत्र पाठविण्यात आल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आले. ८ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०१६ या काळात हा प्रकार आढळून आला. ही फसवेगिरी असल्याचे लक्षात येताच ठाकरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ३० एप्रिल २०१६ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ४७६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस चौकशीच्या घेऱ्यात अडकून अटकेची भीती असल्याने सक्करदरा रघुजीनगर येथील रहिवासी प्रदीप वसंतराव गाडगे (४५) याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम.पी. पुरी हे आहेत. (प्रतिनिधी)