शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाच्या धसक्याने इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 15:11 IST

दोन विजेच्या दिव्याचे बिल २० हजार रुपये आल्याचा धसका घेऊन एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी (अमरावती) : घरात असलेल्या दोन विजेच्या दिव्याचे बिल २० हजार रुपये आल्याचा धसका घेऊन एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली. महादेव पुंजाजी पाटील (४८,रा.रुक्मिणीनगर, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे. महादेव पाटील हे शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यांचे स्थानिक रुक्मिणीनगरात दोन खोल्यांचे घर आहे. महादेव यांना मागील वर्षीच्या आॅगस्ट महिन्यापासून अव्वाच्या सव्वा बिल येते होते. याची तक्रार त्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, त्यांची समस्या जाणून न घेता त्यांना आलेले देयक भरावेच लागेल असे सांगण्यात आले. बिलाची थकबाकी वाढत चालल्याने त्याच्यावर दबाव वाढत गेला. डिसेंबर २०१६ या महिन्याचे वीज बिल २० हजार ३८० रुपये आले आहे. गत महिन्यात आपले वीज बिलाच्या देयकाची रक्कम कमी कशी होईल, यासाठी महावितरणसह अनेकांशी संपर्क साधला असल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. देयकाची संपूर्ण रक्कम भरावीच लागेल, असे महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे मागील पाच दिवसांपासून ते तणावात होते. यातूनच त्यांनी रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक आठवडी बाजारातील आरामशीन जवळ कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.