शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांशी अश्लील संभाषण

By admin | Updated: February 11, 2016 03:26 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपूर कंट्रोल रुमचा फोन सतत खणखणायचा. मात्र कंट्रोल रुममधील महिला पोलिसांना तक्रारीऐवजी...

दोन तरुण अटकेत : महागात पडली मस्करीनागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर कंट्रोल रुमचा फोन सतत खणखणायचा. मात्र कंट्रोल रुममधील महिला पोलिसांना तक्रारीऐवजी अश्लील संभाषण ऐकावं लागायचं. दररोजच्या या प्रकाराला कंट्रोल रुममधल्या महिला कर्मचारी पुरत्या वैतागल्या होत्या. अखेर पोलिसांनी निनावी फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.सूरज पाटील (२३) रा. झिल्पी लोहगड आणि अतुल वाहणे (२०) जरुड वाडा ता. कारंजा जि. वर्धा अशी अटक केलेल्या टवाळखोरांची नावं आहेत. याच दोघांनी नागपूर कंट्रोल रुममध्ये काम करणाऱ्या महिला पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. १ ते २२ जानेवारी या काळात दोघांनी तब्बल ५५ वेळा १०० नंबरवर फोन केला. पलीकडून महिलेचा आवाज आल्यास अश्लील संभाषण केलं. सुरुवातीला नियंत्रण कक्षात कार्यरत महिला पोलिसांनी दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा हे प्रकार वाढू लागले आणि अश्लील संभाषणाने परिसीमा गाठली, तेव्हा पीडित महिला पोलिसांनी महिला डीसीपी दीपाली मासीरकर यांच्याकडे सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले.आरोपी सूरज आणि अतुलने जणू नागपूर पोलिसांनाच आव्हान दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्या जोडगोळीचे मोबाईल फोन ट्रेस केले. तांत्रिक तपासात अश्लील फोन येणाऱ्या नंबरचा शोध लागला आणि तो नंबर सूरज पाटील या युवकाचा निघाला. सूरज पाटील आणि त्याचा मित्र अतुल वाहणे हे दोघे नियंत्रण कक्षाला फोन लावायचे. महिला पोलिसांशी अश्लील संवाद साधायचे. मोबाईल नंबरच्या आधारावर पोलिसांनी दोघांना शोधून काढले. मंगळवारी रात्री पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींचे आईवडील शेतकरी आहेत. सूरज पाटील आणि अतुल वाहणे दोघेही महाविद्यालयीन तरुण आहेत. ते मित्र असून नात्यात भाऊ लागतात. सूरज काटोलच्या एका महाविद्यालयात एमएससी पहिल्या वर्षाला आहे. तर अतुल काटोलमध्येच बीकॉम दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. या प्रकरणात शब्बीरखान रउफखाँ पठाण (३४, रा. नाका नं. २, कामठी रोड) यालासुद्धा अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)२४ तासात आरोपपत्र नियंत्रण कक्षाचे फोन कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे १०० नंबरवर कॉल करून अशी मस्करी महागात पडू शकते, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे. भविष्यात कोणीही १०० नंबरचा दुरुपयोग करू नये म्हणून नागपूर पोलीस सूरज आणि अतुलवर कडक कारवाई करणार आहेत. त्यादृष्टीने २४ तासाच्या आतच दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.