शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मुकी बिचारी, कुणीही हाकू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील सिमेंट रोडवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात वा कमी प्रकाशात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील सिमेंट रोडवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात वा कमी प्रकाशात रोडवर बसणाऱ्या जनावरांमुळे अपघात वाढले आहेत. यात निरपराध लोकांचे बळी जात आहेत. जनावरे बिचारी मुकी आहेत. पण कुणीही हाकू नका. ती रस्त्यावरच फिरायला सोडली आहेत, अशीच भूमिका पशूपालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात मोकाट जनावरांची समस्या आहे. हुडकेश्वर रोड, म्हाळगीनगर, वैशालीनगर, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा रोड, हिंगणा रोड, जयताळा, पारडी, दिघोरी, सक्करदरा, काटोल रोड, कॉटन मार्केट या भागात फेरफटका मारला असता, जागोजागी मोकाट जनावरे रोडवर बसलेली आढळून येतात.

जनावरे मोकाट सोडण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु कठोर कारवाई होत नसल्याने मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट गुरांना पकडण्यासाठी मनपाच्या कोंडवाडा विभागाद्वारे कारवाई केली जाते. परंतु मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. विभागाकडे दोन ट्रॅक्टर ट्रॉली आहेत. अनेकदा जनावरे पकडल्यानंतर मालकांना दंड आकारून जनावरे सोडली जातात. ती पुन्हा मोकाट सोडली जातात. अपघाताचा धोका असल्याने मोकाट जनावरांना मनपा प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी अ‍ॅड. अक्षय समर्थ यांनी केली आहे.

...

पावसाळ्यात समस्या गंभीर

पावसाळ्याच्या दिवसात गोपालक जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडतात. ती रस्त्यावरील कोरड्या जागेत बसतात. सिमेंट रोडवर ठिकठिकाणी मोकाट जनावरे बसलेली असतात. रात्रीलाही जागोजागी जनावरे बसलेली असतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

....

व्यापक कारवाईची गरज

कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई केली जाते. परंतु ती मर्यादित असते. शहरातील विविध भागात यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु विभागाकडे यासाठी सक्षम यंत्रणा नाही. मनपा प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.

...

शहरात हजाराहून अधिक गोठे

नागपूर शहरात १०५० गोठे आहेत. यातील निम्मे अनधिकृत आहेत. वर्दळीच्या भागातही गोठे असून, मोकाट जनावरांची समस्या आहे. काही भागात गोठे चालकांची दादागिरी चालते. यामुळे मनपाचे कर्मचारी कारवाईला घाबरतात. अनेकदा नगरसेवकही अशा कारवाईला विरोध करतात.

...

मोकाट गुरे पकडण्याची मोहीम

मनपाच्या कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जाते. मागील सहा वर्षांत ६,५०० मोकाट गुरे पकडली. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर बेवारस हजाराहून अधिक गुरे गोरक्षणला दान दिली. पावसाळ्यात मोकाट जनावरांची समस्या अधिक असते. याला आळा घालण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी मनपा