शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी श्रीमंत पालक होताहेत गरीब

By admin | Updated: April 6, 2016 03:16 IST

आरटीईच्या २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी अनेक सुशिक्षित आणि समृद्ध पालकांचा गरीब बनण्याकडे ओढ वाढली आहे.

खरे लाभार्थी वंचित : उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध होते सहजनागपूर : आरटीईच्या २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी अनेक सुशिक्षित आणि समृद्ध पालकांचा गरीब बनण्याकडे ओढ वाढली आहे. प्रवेशासाठी एक लाख रुपये उत्पन्नाची अट आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध असल्याने सरकारी कर्मचारी, व्यावसायिक, श्रीमंत पालकांचे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आरईटी अ‍ॅक्शन कमिटीच्या कार्यालयात सध्या अशा पालकांची दररोज विचारणा होत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दुर्बल घटकातील मुलांना क्वॉलिटी एज्युकेशन मिळावे, यासाठी सरकारने आरटीई २००९ कायद्याची अंमलबजावणी केली. सर्व खासगी व नामांकित शाळेत २५ टक्के प्रवेश आरक्षित करण्यात आले. आज शहरातील नामांकित शाळेत ५० ते १ लाखापर्यंत प्रवेशासाठीच द्यावे लागतात. अशा शाळांमध्ये आरटीई अंतर्गत नि:शुल्क प्रवेश होत असल्यामुळे सर्वसामान्य पालकांचे प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला अद्यापही सुरुवात झाली नाही. परंतु प्रवेशासाठी पालक प्रतीक्षेत आहे. पालकांची शिक्षण विभाग व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीकडे दररोज विचारणा होत आहे. गेल्यावर्षी अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहे. यावर्षी नागपुरातील केंद्रीय विद्यालयाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या अजनी शाखेत आठ तर वायुसेनेच्या शाखेत नऊ पालक सरकारी कर्मचारी आहेत. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)प्रक्रियेत बोगसपणाआरटीईमध्ये प्रवेशाच्या नावाखाली सर्व बोगसपणा सुरू आहे. पैसे देऊन वाटेल ते प्रमाणपत्र मिळत असल्याने अनेक श्रीमंतांनी गरिबीचे प्रमाणपत्र बनविले आहे. परंतु आजपर्यंत खऱ्या गरिबांना या प्रक्रियेत प्रवेशच मिळाला नाही. महिला व बालकल्याणच्या आयसीडीएस प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यात शिकणारा एकही मुलगा आरटीईत लाभार्थी झाला नाही. विशेष म्हणजे ही सर्व मुले आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांचे पालकही या प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहेत. शासनाच्या आरटीईच्या धोरणानुसार अशाच मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी शाळांना त्यांच्या परिसरात जनजागृती करणे गरजेचे आहे. १) कारमधून उतरून एक महिला अ‍ॅक्शन कमिटीच्या कार्यालयात आली. या महिलेने आरटीईच्या फॉर्मसंदर्भात विचारणा केली. कार्यालयातील समन्वयकाकडून त्यांचे नाव, उत्पन्नाचे स्रोत जाणून घेण्यात आले. ती महिला स्वावलंबी नगरातील असून महिलेचे पती बॅँकेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशासाठी एक लाख रुपयांची अट असल्याचे सांगण्यात आले. उत्पन्नाचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध होऊन जाते. फॉर्म कधी भरायचा आहे, एवढे सांगा. २) महागडा मोबाईल घेऊन एक व्यक्ती कार्यालयात आली. ज्यांचे सीताबर्डी परिसरात स्वत:चे हॉटेल आहे. त्यांना आपल्या मुलाची अ‍ॅडमिशन आरटीई अंतर्गत करायची आहे. त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल, अशी विचारणा केली. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया समजावून दिल्यानंतर समन्वयकाने त्यांना एक लाख रुपयांच्या उत्पन्नाची अट असल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने एक लाख रुपयांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिल्यास प्रवेश होईल ना, अशी विचारणा केली.