मेडिकल स्टोर्सवर पोलिसांचा छापा : औषधांची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:06 IST2021-05-07T01:01:57+5:302021-05-07T01:06:31+5:30
Police raid medical stores उत्तेजक आणि नशा वाढविणाऱ्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या एका मेडिकल स्टोअर्समध्ये गुन्हे शाखा तसेच अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी छापा मारला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करण्यात आली.

मेडिकल स्टोर्सवर पोलिसांचा छापा : औषधांची अवैध विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तेजक आणि नशा वाढविणाऱ्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या एका मेडिकल स्टोअर्समध्ये गुन्हे शाखा तसेच अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी छापा मारला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करण्यात आली.
इंदोऱ्यातील पंजाब नॅशनल बँकजवळ अजय मेडिकल स्टोअर्स आहे. येथून उत्तेजना वाढवणारे तसेच नशा आणणारे औषध विकले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक प्रकाश नेहते यांना कळाली. त्यावरून त्यांनी बुधवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक शहनाज खलील ताजी यांना सोबत घेऊन अजय मेडिकलमध्ये छापा घातला. यावेळी तेथे अल्प्राझोलम, कोडीन आणि प्लॅनोकप सायरपचा मोठा साठा आढळला. मेडिकल स्टोरचे संचालक अरुण राजानी हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जास्त पैसे घेऊन अवैधरित्या औषध विक्री करत असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तेथून वेगवेगळे औषध साठा जप्त करून आरोपी अरुण राजानी यांच्यावर गुन्हा दाखल केला.