शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला हवे जगण्याचे बळ

By admin | Updated: July 1, 2014 01:04 IST

उद्या ‘कृषी दिना’निमित्त शेतकऱ्याचे राज्यभरात गुणगान होणार आहे. शेतीचा इतिहास उजाळला जाणार आहे. परंतु त्याच वेळी विदर्भातील शेतकरी हा आपल्या बांधावर वरुणराजाची प्रतीक्षा करीत बसला आहे.

पारंपरिक शेतीत बदल हवा : पावसाची प्रतीक्षाजीवन रामावत - नागपूरउद्या ‘कृषी दिना’निमित्त शेतकऱ्याचे राज्यभरात गुणगान होणार आहे. शेतीचा इतिहास उजाळला जाणार आहे. परंतु त्याच वेळी विदर्भातील शेतकरी हा आपल्या बांधावर वरुणराजाची प्रतीक्षा करीत बसला आहे. गतवर्षीची अतिवृष्टी व गारपिटीच्या धक्क्यातून तो सावरण्यापूर्वीच यंदा पुन्हा दुष्काळी संकट उभे ठाकले आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेला आहे. परंतु अजूनही वरुणराजा प्रगटलेला नाही. सुरुवातीला आलेल्या तुरळक पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जून महिन्यात नागपूर विभागात केवळ ५९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जेव्हा की गतवर्षी तो जून महिन्यात ३७२.१ मिलीमीटर झाला होता. दुसरीकडे संपूर्ण विभागात ८ टक्के पेरणी आटोपली असून, १ लाख ३९ हजार ८०० हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. अशास्थितीत उद्या राज्यभर साजरा केल्या जाणाऱ्या ‘कृषी दिना’वर दुष्काळाचे सावट राहणार आहे. भारतीय शेती व्यवसायाला कमी-अधिक पाच हजार वर्षांचा इतिहास सांगितला जातो. ऊन, वारा, पाऊस, किडींचा प्रादुर्भाव व मंदीचे सावट अशा शेकडो संकटाचा सामना करीत बळीराजा हा देशातील कोट्यवधी जनतेचे पोषण करीत आला आहे. मात्र तो स्वत: नेहमीच उपाशी राहिला आहे. त्याने नेहमीच प्रथम देशाचा व समाजाचा विचार केला आहे. परंतु त्याच्या हिताचा विचार करायला कुणालाच वेळ नाही. या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच लांबणीवर टाकण्यात आले आहे. देश हा ‘कृषिप्रधान’ असला तरी या देशाची राजकीय व्यवस्थेने मात्र कृषी या विषयाला कधीच प्रधानपद दिले नाही. विशेष म्हणजे, या देशात शेतकरी या संकल्पनेशी निगडित इतर सर्वच घटकांचा विकास झाला. अविकसित राहिला तो केवळ शेतकरी. तो पदोपदी शोषणाचा बळी ठरला आहे. मग तो गावातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रधारक असो की गावातील सावकार! बँका असो की व्यापारी, प्रकल्प संचालक असो की प्रक्रिया उद्योजक किंवा खुद्द कृषी अधिकारी असो की कर्मचारी. प्रत्येक जण स्वत:च्या ‘मार्जिन मनी’च्या मागे धावत आहे. कृषी योजना राबविणारा कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांपेक्षा स्वत:चेच हित साधण्यात व्यस्त झाला आहे. कृषी विभाग हा कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या नावाखाली केवळ निविष्ठा व साहित्य खरेदीमध्ये मश्गुल आहे. यातून खास कमाईच्या खुर्चीवर बसण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. खाजगीत काही अधिकारी विशिष्ट पदासाठी किती पैसे मोजावे लागतात, याची कबुली देतात. अलीकडे जसजशी देशाची अर्थव्यवस्था व तिचे मापदंड बदलत आहे तसतसे शेतीचे स्वरूपही बदलू लागले आहे. शेतीचे व्यापारीकरण या गोंडस नावाखाली शेतीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हे सर्व घडत असताना वर्षानुवर्षे या व्यवसायात राबणाऱ्या पिढीजात ६० ते ६५ टक्के भूमिस्वामी शेतकऱ्यांचे स्वरूप त्यांची आर्थिक स्थिती व त्यांचे राहणीमान बदलण्यासाठी मात्र कुठेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. मात्र दुसरीकडे शेतीच्या बदलत्या स्वरूपानुसार या व्यवसायाकडे आकर्षित होणारा नवा वर्ग तयार होत आहे. ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, असा वर्ग शेतीला व्यावसायिक तत्त्वावर करू इच्छित आहे. यात दुसरा एक वर्ग आयकरामधील सूट, सवलतीच्या दरातील वीज व कृषी पर्यटन आदींसाठी शेतीकडे हौस म्हणून पाहत आहे. तिसरा वर्ग हा कॉर्पोरेट सेक्टरमधील आहे. ते शेती व्यवसायामध्ये प्रगत तंत्रज्ञान, प्रिसिजन फार्मिंग व इन्टेन्सिव्ह अ‍ॅग्रीकल्चर यासारख्या तंत्राचा वापर करून हित साधण्याचा प्रयत्न करू पाहत आहे.