शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 9:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.

ठळक मुद्देएसपीजी दाखल : कडेकोट पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.छत्रपती सभागृहात पंतप्रधान यांच्या नियोजित नागपूर येथील विविध कार्यक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी पोलीस, महामेट्रो, आरोग्य, एम्स, महानगर पालिका, अन्न व औषध प्रशासन, मिहान, एअर इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोच्या सुभाषनगर ते बर्डी या प्रवासी सेवेचा शुभारंभ होत आहे. तसेच विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य समारंभात विविध योजनांचे तसेच एम्सच्या ओपीडीचे उद्घाटन, वन हेल्थ सेंटर, नॅशनल लेव्हल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स अ‍ॅण्ड शॉपकिपर, नागपूर-उमरेड व गोंडखैरी- धापेवाडा या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हायवेच्या कामाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.पंतप्रधानांच्या कार्यक्रमासंदर्भात सुरक्षा व्यवस्था, नियोजित कार्यक्रमाची पूर्वतयारी तसेच विविध मार्गावरील आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आदी बाबतही विविध विभाग प्रमुखांकडून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आढावा घेतला.चोख सुरक्षा व्यवस्था : ठिकठिकाणची वाहतूक वळवलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ वाढली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) उपराजधानीत दाखल झाला असून, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी २४०० पोलीस तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी यासंबंधाने गुरुवारी पत्रकारांना माहिती दिली.शनिवारी दुपारी ४ वाजता सीताबर्डी-लोकमान्यनगर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान सुभाषनगर ते सीताबर्डीपर्यंत मेट्रोतून सफर करणार आहेत. त्यानंतर ते मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांचा हा प्रवास कारने होणार असून, प्रवास तसेच कार्यक्रमादरम्यानची सुरक्षा व्यवस्था (बंदोबस्त) सांभाळण्यासाठी शहर पोलिसांनी तयारी केली आहे. मेट्रो स्थानकाच्या तसेच क्रीडा संकुलाच्या सभोवताल चोख सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. ११ पोलीस उपायुक्त, २३ सहायक आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक, २०० सहायक आणि उपनिरीक्षक तसेच २१०० पोलीस कर्मचारी ही सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत. आनंद टॉकीज ते मुंजे चौक, मुंजे चौक ते व्हेरायटी चौक आणि झाशी राणी चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगला मनाई (नो-पार्किंग) करण्यात आली आहे. याशिवाय सोनेगाव मंगलमूर्ती चौक, हिंगणा टी-पॉईंट, सुभाषनगर, मातामंदिर, पंचशील चौक, महाराजबाग, व्हेरायटी चौक, टेम्पल बाजार गल्ली, एलआयसी चौक, मानकापूर चौक, पागलखाना चौक, पूनम चेम्बर, बिजलीनगर आदी भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.अतिरिक्त आयुक्त महावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४ वाजतापासून ते पंतप्रधानांचा कार्यक्रम संपेपर्यंत संबंधित ठिकाणी काही वेळेसाठी ही व्यवस्था असेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. वाहन चालक आणि नागरिकांनीही यासंबंधाने सहकार्य करावे, असे ते म्हणाले. यापूर्वी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या दौºयाच्या वेळी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असेही महावरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी किमान एक तास अगोदर यावे. मोबाईल व्यतिरिक्त कोणतेही साहित्य सोबत नेण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त विनिता साहू, विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जयेश भांडारकर, मेट्रोचे सुरक्षा अधिकारी अरविंद गिरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांडे उपस्थित होते. 

असा आहे बंदोबस्त

  • ११ पोलीस उपायुक्त

 

  • २३ सहायक पोलीस आयुक्त

 

  • ८० पोलीस निरीक्षक

 

  • २०० सहायक निरीक्षक उपनिरीक्षक

 

  • २१०० पोलीस कर्मचारी

 

  • राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी

वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त

  • २ पोलीस उपायुक्त

 

  • ४ सहायक पोलीस आयुक्त

 

  • १५ पोलीस निरीक्षक

 

  • ८०० वाहतूक पोलीस

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानNagpur Policeनागपूर पोलीस