शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय गायन आणि वादनाची आनंददायी अनुभूती

By admin | Updated: July 29, 2014 00:49 IST

शास्त्रीय संगीतातील बंदिशीचे माधुर्य, सुरेल बासरीवादन, तबल्यातून निघणारा नाद आणि खंजिरीची साद अशा बहुरंगी संगीताचा आनंद नागपूरकर रसिकांनी मनसोक्त अनुभवला. स्वानंदी संगीत सभेच्या

स्वानंदी संगीत सभेचा शतकोत्तरी संगीत समारोह : रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : शास्त्रीय संगीतातील बंदिशीचे माधुर्य, सुरेल बासरीवादन, तबल्यातून निघणारा नाद आणि खंजिरीची साद अशा बहुरंगी संगीताचा आनंद नागपूरकर रसिकांनी मनसोक्त अनुभवला. स्वानंदी संगीत सभेच्या शतकपूर्तीनिमित्त स्वानंदी युवा संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंटिफिक सभागृहात आयोजित या संगीत सोहळ्यात नवोदित कलावंतांनी शास्त्रीय संगीताचे वैविध्यपूर्ण सादरीकरण केले. नवोदित प्रतिभावान कलाकार सायली आचार्य, श्रुती पांडवकर, रेणुका इंदूरकर, परिमल कोल्हटकर, आदित्य गोगटे, तुषार सूर्यवंशी, तरुण लाला या कलावंतांनी संगीत सोहळ्यात अतिशय दर्जेदार सादरीकरण केले. सायलीच्या गायनाने सभेची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या सायलीने निकोप, सुरेल आवाजात ‘राग मधुवंती’चे सादरीकरण केले. विलंबित एकतालातील ‘मै तो कैसे समझावू, मेरी तरसत अखियाँ...’, ‘मै आऊ तेरे मंदरवा बलिहारी...’ या बंदिशी तिने सादर केल्या. यानंतर आदित्य गोगटे याने सुरेल बासरीवादन केले. त्याने बासरीवादनातून ‘राग दर्गा’ आणि ‘राग देश’ अगदी सरलतेने सादर करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. श्रुती पांडवकरचे राग बागेश्रीतील ‘मोहे मनावन आये हो...’, ‘मानेना सखी संैय्या मोरा...’ हे सादरीकरण आनंददायी होते. राग बसंतीमध्ये तिने ‘गरजत घन आयोरी...’ ही बंदिश सादर केली. दिग्गज गुरूंच्या तालमीत संगीताची साधना करणारी व भावपूर्ण स्वरसाजाची सुपरिचित युवा गायिका रेणुका इंदूरकर हिने यावेळी ‘मोरे मन भाये...’, ‘खेल रही मन भावन कलियाँ...’ या बंदिशीचे सादरीकरण केले. परिमल कोल्हटकर याने राग बिहागडामध्ये ‘प्यारी पग होले होले धरिये...’ व ‘कैसे आऊ पिया मै तोरे पास...’ या बंदिशी सादर केल्या. तरुण लाला याच्या तबलावादनातून निघालेला नाद आणि तुषार सूर्यवंशीच्या खंजिरीची साद याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन तृष्णा आंबेकर व आभारप्रदर्शन साधना शिलेदार यांनी केले. ज्येष्ठ तबला कलाकार राजू गुजर यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)