शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 00:55 IST

‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

ठळक मुद्देउपलब्ध व्यवस्थेची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. गुरुवारी त्यांनी दोन्ही ठिकाणी पाहणी करत उपलब्ध व्यवस्थेचा आढावा घेतला.राऊत यांनी ‘मेयो’तील ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ला भेट दिली. अतिरिक्त खाटांची आवश्यकता भासल्यास पुरेशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच ‘व्हेंटिलेटर’ व इतर यांत्रिक सामुग्रीची माहितीदेखील त्यांनी जाणून घेतली. ‘कॉम्प्लेक्स’मधील प्राणवायू पुरवठ्याची व्यवस्था स्वतंत्र ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे वॉर्डातील स्वच्छता व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत रुग्ण व नातेवाईकांना माहिती देण्यासदेखील त्यांनी सांगितले.यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार मोहन मते, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अप्पर आयुक्त अभिजीत बांगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.‘आयएमसीआर’ व ‘डब्लूएचओ’च्या निकषानुसार वॉर्ड तयार करापालकमंत्र्यांनी ‘मेडिकल’चीदेखील पाहणी केली. तेथे कोविड १९ हा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे ‘स्कॅनिंग’ करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिली. मेडिकलमध्येही ५० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोविड १९ उपचारासाठी तयार करण्यात येणारे वॉर्ड ‘आयएमसीआर’ व ‘डब्ल्यूएचओ’च्या निकषानुसार तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या वॉर्डसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय