डुकराची ॲक्टिव्हाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:04+5:302020-11-28T04:08:04+5:30
खापरखेडा : राेड ओलांडणारे डुक्कर ॲक्टिव्हावर धडकले आणि दुचाकीचालक आराेग्यसेविका खाली काेसळल्या. त्यात त्यांना गंभीर दुखपत झाली. ही घटना ...

डुकराची ॲक्टिव्हाला धडक
खापरखेडा : राेड ओलांडणारे डुक्कर ॲक्टिव्हावर धडकले आणि दुचाकीचालक आराेग्यसेविका खाली काेसळल्या. त्यात त्यांना गंभीर दुखपत झाली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गावरील सब्बल नाल्याजवळ बुधवारी (दि. २५) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
शुभांगी गुलशन काकडे (३५, रा. नागपूर) या चिचाेली (खापरखेडा) प्राथमिक आराेग्य केंद्रात आराेग्यसेविकापदी कार्यरत आहेत. बुधवारी ‘नाईट शिफ्ट’ असल्याने त्या एमएच-४९/एबी-१४९० क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने नागपूरहून दहेगाव (रंगारी) मार्गे खापरखेडा येथे येत हाेत्या. दरम्यान, या मार्गावरील सब्बल नाल्याजवळ राेड ओलांडणाऱ्या डुकराने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यामुळे त्या खाली काेसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी त्यांना चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे त्यांच्यावर प्रथमाेपचार करण्यात आले. त्यांच्या डाेके व कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नंतर नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.