शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणावर साकारले मुख्यमंत्र्यांचे चित्र

By admin | Updated: August 10, 2015 02:46 IST

‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...

प्रमोदबाबू रामटेके यांची कलाकृती : विजय दर्डा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना भेटनागपूर : प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी पाषाणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले आहे. संबंधित ‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले. प्रमोदबाबू यांनी ‘अ‍ॅक्रेलिक’रंगाचा वापर करून ही कलाकृती साकारली असून, जगात पहिल्यांदाच पाषाणावर असे चित्र साकारण्यात आले आहे. प्रमोदबाबू यांनी मुख्यमंत्र्यांचे चित्र साकारलेला पाषाण ओबडधोबड व नैसर्गिक अवस्थेत आढळलेला आहे. त्या पाषाणाला हाताने किंवा इतर साहित्याने कोरून कुठलाही आकार दिलेला नाही. प्रमोदबाबूंनी काढलेल्या अशाप्रकारच्या कलाकृतीचे प्रदर्शनही नुकतेच नागपुरात आयोजित करण्यात आले होते. अशाप्रकारे पाषाणावर काढलेल्या चित्रांचे हे जगातील पहिलेच प्रदर्शन होते. खा. दर्डा यांनी संबधित कलाकृती मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; सोबतच प्रमोदबाबू यांची मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली व त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामाची माहितीही दिली. संबंधित पाषाणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विजयी मुद्रेतील हसमुख चित्र काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वत:चे पाषाणचित्र पाहून थक्क झाले. त्यांनी दिलखुलासपणे या कलाकृतीची प्रशंसा केली व उपस्थितांसह या कलाकृतीच्या मागे उभे राहून विजयी मुद्रेची पोज देत छायाचित्र काढले. यावेळी दिलीप छाजेड व बिपीन सुळे उपस्थित होते. भेटीनंतर लोकमत प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांचेच पाषाणचित्र का काढावेसे वाटले, असे प्रमोदबाबूंना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील ‘रॉक पर्सनॅलिटी’ आहेत; शिवाय नागपूरची व्यक्ती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा प्रत्येक नागपूरकराला अभिमान आहे. त्यामुळेच आपण पाषाणावरील चित्र काढण्यासाठी त्यांची निवड केली. (प्रतिनिधी)कोण आहेत प्रमोदबाबू?प्रमोदबाबू रामटेके हे जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे अध्यापक होते. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सच्या संचालकांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांचे चित्र काढण्यासाठी चित्रकाराचा शोध घेण्यासाठी एक चमू भारतात पाठविली होती. या चमूने रिसर्च करून प्रमोदबाबू यांची निवड केली. राष्ट्रपतींचे पाहुणे म्हणून प्रमोदबाबू हे चार दिवस राष्ट्रपतीभवनात राहिले. राष्ट्रपती नारायणन यांच्यासमोर बसून त्यांनी त्यांचे चित्र काढले. संबंधित चित्र लंडनला नेऊन लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये लावण्यात आले आहे.