शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:31 PM

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक हित साध्य करण्यासाठी याचिका केल्याचा ठपका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. फडणवीस यांनी अ‍ॅट्रासिटीचे प्रकरण लपवून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र हा दावा सिद्ध न करू शकल्याने वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी याचिका केल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्त्यावर न्यायालयाने दंड ठोठावला.याचिकाकर्त्याचे नाव सुरेश रंगारी असे आहे. त्याने १ जानेवारी २०१९ ला वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील पोलीस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. फडणवीस यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना फडणवीस यांनी या गुन्ह्याची माहिती लपवून ठेवली, असा दावा याचिकाकर्त्याने केला. त्याने याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १० ऑक्टोबरला तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर काही कारवाई न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. झका हक व न्या. मुरलीधर गिरटकर याच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकली. यादरम्यान याचिकाकर्त्यास त्याचा दावा सिद्ध करण्यात यश आले नाही. त्यामुळे केवळ वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठीच ही याचिका करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. हा ठपका ठेवत त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. २९ नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयात हा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास याचिकाकर्त्याविरुद्ध जामिनपात्र वॉरंट बजावण्यात येणार आहे. अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस