काँग्रेसच्या ‘नकारात्मक फॉर्म्युला’ला जनतेने नाकारले, आता तरी आत्मचिंतन करावे
By योगेश पांडे | Updated: February 10, 2026 16:26 IST2026-02-10T16:24:45+5:302026-02-10T16:26:27+5:30
Nagpur : जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये महायुतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. तर विरोधकांनी केवळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला.

People rejected Congress' 'negative formula', now at least we should introspect
लोकमत न्यजू नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये महायुतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. तर विरोधकांनी केवळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला. भाजपचा पराभव झाला तर आमचा कार्यकर्ता आत्मचिंतन करून पुन्हा कामाला लागतो, मात्र काँग्रेसकडे केवळ टीका करण्याचाच फॉर्म्युला आहे. मात्र जनतेने त्यांचा फॉर्म्युला नाकारला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंगळवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे नेते केवळ टिकेच्या आधारावर मते मागतात. सातत्याने होत असलेल्या पराभवानंतर त्यांनी आता तरी नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे. काँग्रेस आता जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून दूर गेली आहे. लोकांनी नाकारलेले मुद्दे घेऊन ते राजकारण करत आहेत. त्यांनी आपला अजेंडा विकासावर सेट केला तर त्यांच्यासाठी ते जास्त चांगले ठरेल, असे बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस राजकीय चर्चेसाठी दिल्लीत गेलेले नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठीच दिल्लीला जातात असे नाही. राज्याचा आगामी अर्थसंकल्प आणि केंद्राकडून मिळणारी मदत या विषयावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्यानंतर सदिच्छा भेट म्हणूनही हा दौरा असू शकतो. असेही बावनकुळे म्हणाले.