शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचे कार्यालय रामटेकच्या वाटेवर

By admin | Updated: May 12, 2014 00:31 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने प्रशासकीय कामकाजाच्या सुलभतेसाठी पेंचचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) कार्यालय रामटेक येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ंनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने प्रशासकीय कामकाजाच्या सुलभतेसाठी पेंचचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) कार्यालय रामटेक येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी काही अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍यांमध्ये फेरबदल करून, प्रशासकीय कामकाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंबंधी नुकतेच दोन दिवसांपूर्वी आदेश जारी झाले आहेत. या नवीन फेरबदलानुसार आतापर्यंत उमरेड-कºहांडला अभयारण्याची जबाबदारी सांभाळत असलेले सहायक वनसंरक्षक नंदकिशोर काळे यांच्यावर पश्चिम पेंच क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवाय बोर अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या खांद्यावर बोर, टीपेश्वर व उमरेड-कºहांडला अभयारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सीसीएफ रेड्डी यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी हा फेरबदल केला असल्याची माहिती आहे. यानंतर आता लवकरच पेंचचे विभागीय वन अधिकारी कार्यालय रामटेक येथे स्थानांतरित केले जाणार आहे. त्यानंतर सध्या नागपुरातील मुख्य कार्यालयात बसणारे पेंचचे विभागीय वन अधिकारी व सहायक वनसंरक्षक रामटेक येथील विभागीय कार्यालयात जातील. आतापर्यंत पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयावर पेंच उद्यानासह मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला, बोर व टीपेश्वर या चार अभयारण्याची जबाबदारी होती. परंतु अलीकडेच यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा हे नवीन अभयारण्य पेंच कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता पेंच कार्यालयाचे कार्यक्षेत्र व जबाबदारी वाढली आहे. (प्रतिनिधी)