शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर - ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे; मात्र अनेक खासगी चालकांनी ...

नागपूर - ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे; मात्र अनेक खासगी चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआम लूट चालविली आहे. परिणामी, गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाण्यासाठी किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेण्यासाठी अनेकांवर पदरमोड करण्याची वेळ येत आहे. आरटीओने २५ किलोमीटरपर्यंत ४०० रुपये दर ठरवून दिले असताना तीन पट भाडे आकारले जात आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ८९१ रुग्णवाहिकेची नोंद आहे; परंतु बहुसंख्य रुग्णवाहिका सेवेच्या नावावर व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. अमर्याद कमाईमुळे अनेक जण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. सर्वसाधारण चालकापासून भंगारवाल्यांपर्यंत, तसेच विविध पक्ष, संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. खासगी अ‍ॅम्ब्युलन्सचा मोठा तळ मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयाच्या परिसरात आहे. जागा मिळेल तिथे उभ्या राहणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर काहींची मेहरनजर आहे.

-रुग्ण पळविण्याच्या टोळीत काही खासगी रुग्णवाहिका चालक

मेयो, मेडिकलमध्ये शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयांतील गैरसोयीची माहिती देऊन, त्यांना भीती दाखवून रुग्णांना खासगी रुग्णालयात पळविण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. यातून मिळणाऱ्या कमिशनच्या लोभेपोटी काही खासगी अ‍ॅम्ब्युलन्सचालक या कामात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना याची माहिती आहे; परंतु कोणीच काही बोलत नसल्याने त्यांचाही यात समावेश असावा, अशी शंका आहे.

-आरटीओने ठरवून दिलेल्या दरपत्रकाला विचारतो कोण

आरटीओने मारुती, टाटासुमो विंगर व टेम्पो ट्रॅव्हलरसाठी १ ते २५ किलोमीटरपर्यंत जवळपास ४०० ते ६०० रुपये तर, महानगरपालिकेच्या हद्दीत प्रति किलोमीटरसाठी १४ रुपये दर ठरवून दिले आहेत; परंतु या दरपत्रकाला विचारतो कोण, हा प्रश्न आहे. खासगी रुग्णवाहिकाचालक या दराच्या तीनपट दर आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय रुग्णालयात अ‍ॅम्ब्युलन्ससाठीचे दरफलक पार्किंगच्या ठिकाणी लावल्यास मृताच्या नातेवाइकांची लूट होण्याचे प्रमाण कमी होईल, असे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

-रुग्णवाहिकेला या मिळतात सवलती

आरोग्य सेवेत अ‍ॅम्ब्युलन्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्य सरकारने अ‍ॅम्ब्युलन्सला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे. रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला निळा दिवा व सायरन वाजविण्याची मुभाही आहे. वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नसते. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नसतो. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या जातात; मात्र याचा गैरफायदाच घेत असल्याचे दिसून येत आहे.