शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पतंजली फूड व हर्बल पार्कचे उद्या भूमिपूजन

By admin | Updated: September 9, 2016 03:11 IST

मिहानमधील बहुचर्चित पतंजली फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी, १० सप्टेंबरला होणार आहे.

मिहानमध्ये २३० एकर जागेत प्रकल्प : पतंजलीचे एक लाख साधक येणारनागपूर : मिहानमधील बहुचर्चित पतंजली फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी, १० सप्टेंबरला होणार आहे. या समारंभात आतापर्यंतचा कॉर्पोरेटचा शिष्टाचार मोडून पतंजलीचे लाखांहून अधिक साधक एकत्रित येणार आहे. तसेच यावेळी शेतकरी संमेलनसुद्धा होणार आहे. भूमिपूजनाची सुरुवात यज्ञाने होणार आहे. भूमिपूजनाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू असून पतंजलीचे वरिष्ठ पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यक्रमासाठी पतंजली किसान सेवा समिती सक्रिय झाली आहे. स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण शुक्रवार, ९ सप्टेंबरला नागपुरात येत आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत यज्ञ, ११ वाजता शिलान्यास आणि दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ ते १ या वेळेत भूमिपूजन समारंभ होणार आहे. या समारंभात मुख्य अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विशिष्ट अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनीला मिहानमध्ये २५.५० लाख रुपये एकरी भावात २३० एकर अविकसित जमीन दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलीकडेच पतंजली किसान सेवा समितीची बैठक झाली. निर्णयानुसार भूमिपूजन समारंभात एक लाखापेक्षा जास्त साधक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नागपूरसह बुलडाणा, नांदेड, वाशीम, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदियासह संपूर्ण विदर्भातील साधक उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. नागरिकांना भूमिपूजनस्थळी येण्यासाठी बसेसची सोय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)