मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी फडकवला पक्षाचा ध्वज; भाजप स्थापना दिनी युवा मोर्चाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:43 IST2026-04-04T19:42:39+5:302026-04-04T19:43:41+5:30
Nagpur : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज नागपूर महानगरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा अधिकृत ध्वज सुपूर्द करण्यात आला.

Party flag hoisted at Chief Minister Devendra Fadnavis' residence; Yuva Morcha initiative on BJP foundation day
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज नागपूर महानगरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा अधिकृत ध्वज सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील धरमपेठ येथील खासगी निवासस्थान असलेल्या 'त्रिमूर्ती' बंगल्यावर यावेळी पक्षाचा ध्वज सन्मानाने लावण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि भाजपच्या जाज्वल्य प्रवासाचा उल्लेख करत स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
"पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे,असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.