शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची थकीत फी पालकांना भरावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 06:04 IST

गेल्या महिन्यापासून पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेकडून मिळत असलेल्या संदेशांमुळे पालक संभ्रमात आहेत.

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालकांना कुठल्याही परिस्थितीत शाळेची फी द्यावीच लागणार आहे. फी न घेण्याबाबत राज्य सरकारने कुठलीच सूट दिलेली नाही. शिक्षण विभागाने पालकांना फी भरण्यासाठी सवलत देण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत यासंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभागाने दिशानिर्देश जारी केले आहेत. यात कुठेही पालकांना शाळेची फी जमा करू नये, असे सांगितलेले नाही.गेल्या महिन्यापासून पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेकडून मिळत असलेल्या संदेशांमुळे पालक संभ्रमात आहेत. शाळेकडून फी ची थकीत रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे. नवीन सत्राची फी जमा करण्यासाठी अवधी दिला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने केंद्रीय माध्यमिक श्क्षिण मंडळ (सीबीएसई) व राज्य शिक्षण मंडळाशी संबंधित विना अनुदानित इंग्रजी माध्यमांचे शाळा संचालक व संस्था संचालकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संस्थाचालकांचे म्हणणे आहे, की राज्याच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १८ मे रोजी एक पत्र सर्व शाळांना पाठविले. यात सर्वच बोर्डाच्या शाळांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, पालकांना थकीत फी वसुलीसाठी वेळ देण्यात यावा. पूर्ण फी एकदाच न घेता, काही हप्त्यात देण्याची सुविधा द्यावी. सोबतच नवीन शैक्षणिक सत्रात फीमध्ये कुठलीही वाढ करू नये, असे नमूद केले आहे. त्यानुसार शाळांनी फीमध्ये वाढ केलेली नाही. केवळ पालकांकडून गेल्या सत्रातील थकीत असलेली फी मागितली जात आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनीसुद्धा याला दुजोरा दिला आहे.पालकांवर दबाव टाकण्यात येत नाहीमहाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे म्हणाले, शाळेकडून पालकांना बळजबरीने फी भरण्याचे संदेश पाठविण्यात येत नाही. थकीत फी आपल्या सुविधेनुसार जमा करण्यास सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या गाईडलाईनमध्ये असे कुठेच सांगण्यात आले नाही की पालकांकडून फी घेऊ नका.