शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

पारशिवनी, वानाडोंगरी जिल्हा परिषद क्षेत्राबाहेर

By admin | Updated: January 13, 2017 01:58 IST

पारशिवनीला नगर पंचायत व वानाडोंगरीला नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्टाचा निर्वाळा : सर्कल्सची पुनर्रचना होणार नागपूर : पारशिवनीला नगर पंचायत व वानाडोंगरीला नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरविला. त्यामुळे पारशिवनी नगर पंचायत व वानाडोंगरी नगर परिषदेंतर्गत येणारे क्षेत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्राबाहेर गेले आहे. आता या दोन्ही क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याची निवडणूक घेता येणार नाही. परिणामी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्कल्सची पुनर्रचना करावी लागणार आहे.उच्च न्यायालयाने या दोन्ही क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक घेण्यावर अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी, त्यापूर्वी सर्कल्सची पुनर्रचना करावी लागणार आहे. राज्य शासनाने २५ आॅक्टोबर २०१६ रोजी पारशिवनीला नगर पंचायतचा दर्जा देण्याची तर, २६ आॅक्टोबर २०१६ रोजी वानाडोंगरीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने त्यापूर्वीच जिल्हा परिषद सर्कल्सची रचना करून आरक्षण सोडतही काढली होती. आता ही प्रक्रिया नव्याने करावी लागेल. त्यातून अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पारशिवनी विषयी माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल तर वानाडोंगरीविषयी माजी सरपंच महानंदा पाटील व सतीश शहाकार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी या दोन्ही याचिका मंजूर करून हा निर्वाळा दिला.