नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे. ...
शहरातील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळांबाबत काय निर्णय घेण्यात आला अशी विचारणा करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शेकडो घरे तुटणार आहेत. तसेच मोकळ्या जमिनी आरक्षित करून सरकार त्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. परंतु यासाठी मोबदला मिळणार नसल्याची माहिती आहे. ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. ...
मैत्रिणीच्या पार्टीत सहभागी झालेल्या संदीप गेंदलाल यादव (वय ३२, रा. यादवनगर, गवळीपुरा, कामठी) या तरुणाला पार्टीतील तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात् ...
दारूचे व्यसन भागविण्यासाठी गुन्हे करणाऱ्या एका तरुणाच्या सदर पोलिसांनी मुसक्या बांधल्या. दीपक श्याम मेनलू (वय २५) असे त्याचे नाव असून, तो सदरमधील गोवा कॉलनीतील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची मोटरसायकल तसेच पाच मोबाईल जप्त केले. ...
संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुम ...