मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:43 PM2019-06-03T23:43:12+5:302019-06-03T23:45:14+5:30

संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

NMC decision: Responsibility for maintenance of traffic signals to the same firm | मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे

मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे

Next
ठळक मुद्देहायकोर्टातील याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.
मनपाने ७० लाख ५३ हजार ८८० रुपयाच्या या कंत्राटाची सप्टेंबर-२०१६ मध्ये नोटीस जारी केली होती. मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनने मूळ दरापेक्षा १५.३ टक्के कमी दराने हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण समान रकमेत काम करण्यास तयार झाले. परिणामी, मनपाने सर्वांच्या सुविधेकरिता शहराची तीन भागात विभागणी करून तिघांनाही कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रस्ताव जारी करण्यात आला. त्याविरुद्ध मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका तेव्हापासून प्रलंबित होती. दरम्यान, अन्य दोन कंत्राटदारांनी आता २०१६ मधील दराने काम करण्यास नकार देऊन माघार घेतली. त्यामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी मनपाला या कंत्राटावर सुधारित निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, मनपाने मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनलाच संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

Web Title: NMC decision: Responsibility for maintenance of traffic signals to the same firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.