ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. ...
वारंवार नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने ८३६ व्यावसायिकांचे बँक खाते गोठविले आहे. या व्यावसायिकांकडे सुमारे १०२ कोटींची थकबाकी आहे. ...
वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे. ...
नवीन एजन्सीने प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन तयार केले आहे. जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा टाकू नये, यासाठी संबंधित एजन्सीने सतर्क असणे आवश्यक आहे. येथे कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. ...
मयत शेतकऱ्याच्या पत्नीला विमा दाव्याचे दोन लाख रुपये ९ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. ...
सम्राट अशोकाने देशभरात ८४ बौद्ध स्तुप आणि विहारे बांधल्याचा इतिहास आहे. हाच धागा पकडून व्हिएतनामने बौद्ध धम्म गतिमान करण्याच्या उद्देशाने भारतात ८४ हजार बुद्ध मूर्ती दान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...
अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले. ...
नागपूर : राज्यातील सत्तांतरामुळे नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष अनुदानाची फारशी अपेक्षा नाही. याचा विचार करता अर्थसंकल्पातील उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. ...