नागपूर मनपाने ६२ कोटीचे कार्यादेश रोखल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:48 AM2020-03-05T10:48:59+5:302020-03-05T10:50:34+5:30

कार्यादेश झालेली ६२ कोटींची कामे मनपा प्रशासनाने थांबविल्याचा आरोप स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष प्रदीप पोहणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

Nagpur municipal corporation charged with issuing mandate of Rs 62 crore | नागपूर मनपाने ६२ कोटीचे कार्यादेश रोखल्याचा आरोप

नागपूर मनपाने ६२ कोटीचे कार्यादेश रोखल्याचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे३५० कोटी अप्राप्त ३८८ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरीस्थायी समिती अध्यक्षांचा आयुक्तांवर थेट आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहर विकासासाठी भरघोष निधी दिला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य सरकारकडून महापालिकेला विशेष अनुदान मिळाले. यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळाली. परंतु राज्य सरकारकडून अपेक्षित ३५० कोटींचे अनुदान महाविकास आघाडी सरकारने दिले नाही. तसेच कार्यादेश झालेली ६२ कोटींची कामे मनपा प्रशासनाने थांबविल्याचा आरोप स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष प्रदीप पोहणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी, तत्कालीन पालकमंत्री यांच्या जनता दरबारात आश्वासन दिल्यानुसार विकास कामांसाठी १०० कोटी आणि सिवरेज व अन्य विकास कामासाठी १०० कोटींचे विशेष अनुदान मिळणार होते. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून हा निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिली.
यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेते संदीप जाधव, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते. आर्थिक वर्षात स्थायी समितीने ३८८ कोटींच्या विविध विकास कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली.
७७२ कोटींच्या निविदांना मंजुरी
आर्थिक वर्षात शासकीय अनुदान व मनपा निधीतून सुमारे ७७२ कोटींच्या विकास कामांच्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली. यात सिमेंट काँक्रिट रस्ते, रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती, पावसाळी व भूमिगत नाली निर्माण, शहरातील नाले बांधणे, खेडेगावाची सुधारणा, ५७२ व १९०० ले-आऊ टमधील विकास, एलईडी दिवे, अग्निशामक स्थानकांचे निर्माण, अमृत योजनेतील कामे यासह शहरातील विविध विकास कामांचा समावेश आहे.

Web Title: Nagpur municipal corporation charged with issuing mandate of Rs 62 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.