१५ फेब्रुवारीनंतर जे प्रवासी चीन, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, साऊथ कोरिया आणि इराण या देशातून आले असतील अशा प्रवाशांना शोधून त्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. ...
गुरुवारी या पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासरे व आईला तसेच त्यांच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि दुबईहून आलेल्या दोन अशा सात संंशयितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी ...
गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ...
नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ४० टक्के पदे रिक्त असून, सफाई कर्मचारी गृहित धरले तर ही संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. ...
तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले. ...
९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. ...
भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली. ...
इतिहासकारांनी आपले शोध जरूर करावे आणि कुठे तरी एकत्र येऊन पुढच्या पिढीपुढे खरा इतिहास पुढे आणावा, असे आवाहन शिवचरित्राचे प्रख्यात व्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांनी आज येथे केले. ...