नागपुरात ७ कोरोना संशयितांची भर; पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांचे नमुने घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 04:14 PM2020-03-12T16:14:03+5:302020-03-12T16:14:23+5:30

गुरुवारी या पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासरे व आईला तसेच त्यांच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि दुबईहून आलेल्या दोन अशा सात संंशयितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

7 Corona suspects in Nagpur; Samples of positive patient families were taken | नागपुरात ७ कोरोना संशयितांची भर; पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांचे नमुने घेतले

नागपुरात ७ कोरोना संशयितांची भर; पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांचे नमुने घेतले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर- बुधवारी ४५ वर्षांच्या एका कोरोना संशयित रुग्णाचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. गुरुवारी या पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासरे व आईला तसेच त्यांच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि दुबईहून आलेल्या दोन अशा सात संंशयितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या संशयितांचे नमुने जर निगेटिव्ह आले तर पॉझिटिव्ह रुग्ण सोडून बाकी सर्वांना घरी पाठवले जाईल. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात चार संशयित रुग्णांचे नमुने घेऊन मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


उपराजधानीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर
अमेरिकेहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गुरुवारी डॉक्टरांनी सांगितले. त्याला मेयो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Web Title: 7 Corona suspects in Nagpur; Samples of positive patient families were taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.