रविवारी दुपारी एका छोट्याशा सोल्जरने रुट मार्च करणाऱ्या वॉरियर्सना कडक ‘सॅल्यूट’ ठोकून त्यांचे अभिनंदन केले. नुसते अभिनंदन करूनच तो थांबला नाही तर त्यांना चहापाणी देऊन त्यांचे स्वागतही केले. हा प्रकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. ...
कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे. ...
चोर घरात आहेत, गुंड घरी आहेत. एकीकडे दारूची दुकानेही बंद आहेत. लोकही घरी आहेत. चोरीची संधी नाही, कुठला गुन्हा घडविण्यासाठी बाहेर पडता येत नाही. गुंडांनीच स्वत:ला ‘लॉकडाऊन’ करून घेतल्याने शहरात गेल्या २४ तासात एकही गंभीर गुन्हा दाखल झालेला नाही. ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या मृताच्या व त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. रविवारी ही संख्या १४ वर गेली. बाधितांकडून संसर्ग झालेला हा आकडा आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये सर्वाधिक आहे. ...
नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे. ...
‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला आहे. ...
आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. ...