CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा तीन गर्भवतीसह ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३१५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:49 PM2020-05-13T22:49:45+5:302020-05-13T22:54:48+5:30

मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे.

In Nagpur again 11 positive including three pregnant, 315 patients | CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा तीन गर्भवतीसह ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३१५

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा तीन गर्भवतीसह ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३१५

Next
ठळक मुद्देदोन लहान मुलांसह बाळंतीणीची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, एका बाळंतीणीने कोरोनावर मात करीत सलग १५ दिवसानंतर बाळाला कुशीत घेतले. आज बरे झालेल्यांची संख्या १० असून एकूण ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
नागपुरात गेल्या दोन महिन्यात १३ गर्भवती महिलांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह गर्भवती महिलेवर उपचारादरम्यान इतरांनाही लागण होऊ नये म्हणून या महिलांची तातडीने चाचणी करण्याचा सूचना आहेत. विशेष म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी अशाच एका महिलेची प्रसुतीनंतर तिचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होेते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा महिलांच्या नमुन्यांची युद्धपातळीवर चाचणी करण्याचा सूचना आहेत. रेड झोनमध्ये तर अशा महिलांची त्यांच्या वसाहतीत जाऊन तपासणी केली जात आहे. सोमवारी मोमीनपुरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या ६० महिलांमध्ये तीन गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्या. याच भागातील काही नमुने माफसू प्रयोगशाळेत आज तपासण्या आले असता पाच नमुने पॉझिटिव्ह आले. यात पुन्हा तीन महिला गर्भवती तर ६० व ७५ वर्षीय महिला आहे. या पाचही महिला मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले नव्हते. एम्सच्या प्रयोगशाळेत एका खासगी हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय वॉर्ड बॉयचा नमुना पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत एक पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा सतरंजीपुरा येथील रहिवासी आहे. या रुग्णाला व्हीएनआयटीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मेयोच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्व रुग्ण मोमीनपुरातील असून पाचपावली येथे क्वारंटाईन होते.

मेयो व मेडिकलमधून प्रत्येकी पाच रुग्ण बरे
मेयोमधून एका बाळंतीणीसह पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात मोमीनपुरा येथील २८ वर्षीय बाळंतीण तर सतरंजीपुरा येथील ३३, ४५ वर्षीय महिला, २८ व ३९ वर्षीय पुरुष आहे. मेडिकलमधील दोन वर्षाचा मुलगा व तीन वर्षाच्या मुलीसह पाच जणांनी कोरोनाला हरविले. यात ३५ वर्षीय महिला ही शांतिनगर येथील असून उर्वरीत मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत.

खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह ५०वर क्वारंटाईन
कमाल टॉकीज, शंकरनगर व डिगडोह येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या एका महिला रुग्णाने उपचार घेतल्याने येथील डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचारी अशा ५० लोकांना एका खासगी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे, कमाल टॉकीज येथील खासगी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड बॉय पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १०३
दैनिक तपासणी नमुने ५००
दैनिक निगेटिव्ह नमुने ४८९
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३१५
नागपुरातील मृत्यू ४
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १८०२
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २२५३
पीडित-३१५-दुरुस्त-११२-मृत्यू-४

Web Title: In Nagpur again 11 positive including three pregnant, 315 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.