कोविड सेंटरसंदर्भातील भ्रामक वृत्तावर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:10 AM2020-05-14T00:10:14+5:302020-05-14T00:16:28+5:30

कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महापालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले ‘कोविड केअर सेंटर’ कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या केंद्रातील बेड एका रात्रीतून गायब झाले या आशयाचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

Don't believe the misleading news about Kovid Center | कोविड सेंटरसंदर्भातील भ्रामक वृत्तावर विश्वास ठेवू नका

कोविड सेंटरसंदर्भातील भ्रामक वृत्तावर विश्वास ठेवू नका

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महापालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले ‘कोविड केअर सेंटर’ कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या केंद्रातील बेड एका रात्रीतून गायब झाले या आशयाचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
कळमेश्वर मार्गावरील कोविड केअर सेंटर हे सर्वात मोठे केंद्र उभारण्यात नागपूर महापालिकेने महत्त्वाची भूमिका निभावली. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना नागपुरात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे त्यावर नियंत्रण मिळविता आले आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. असे असतानाही भविष्यात कुठल्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास संपूर्ण तयारी असावी. यासाठी राधास्वामी सत्संग न्यासच्या सहकार्याने पाच हजार बेड क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही दखल घेतली. सदर केंद्रात सध्या ५०० बेड ठेवण्यात आले असून वेगवेगळे कम्पार्टमेंट करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार त्या कम्पार्टमेंटमध्ये बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ ५०० बेडसाठी आवश्यक कम्पार्टमेंटमध्ये बेड आहेत. शिवाय इतके मोठे केंद्र उभारताना सर्वच तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. वायुव्हिजन, वीज, पाणी या सर्वच बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वर्तमानपत्राने ज्या कम्पार्टमेंटमध्ये बेड नाहीत, त्या कम्पार्टमेंटचे छायाचित्र काढून प्रकाशित केले. अशा आपात्कालिन परिस्थितीत असे दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करून जनतेमध्ये भ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे संपूर्ण वृत्त वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. नागपूर महापालिका कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी आणि येणाºया परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनतेने अशा दिशाभूल करणाºया वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

‘कोविड’ सेंटरमध्ये आवश्यक सुविधा सज्ज ठेवा
कोरोनाबांधितांची वाढती संख्या विचारात घेता महापालिकेने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे. उपमहापौर मनिषा कोठे, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके व आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी या सेंटरला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. येथे आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पाच हजार बेड क्षमतेचे कमी कालावधीत तयार करण्यात आलेले हे पहिलेच कोविड केअर सेंटर असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. जून-जुलै महिन्यात बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्यास ही व्यवस्था केली आहे. येथे सामूहिक शौचालय आहे. त्यांची संख्या वाढविण्यात यावी. येथे देखभालीसाठी तैनात करण्यात येणाऱ्या सफाई कामगारांना बाधा होणार नाही. यासाठी उपाययोजना कराव्या, रुग्णांची संख्या विचारात घेता त्यांना एकाच शेड खाली ठेवताना पार्टीशन करण्यात यावे, अशी सूचना झलके यांनी केली.

Web Title: Don't believe the misleading news about Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.