औद्योगिक वसाहतींतील सर्व उद्योग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:25 AM2020-05-14T00:25:03+5:302020-05-14T00:27:32+5:30

कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी येथे दिले.

Start all industries in industrial estates | औद्योगिक वसाहतींतील सर्व उद्योग सुरू करा

औद्योगिक वसाहतींतील सर्व उद्योग सुरू करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी येथे दिले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांना येणाºया अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डी.एम. पंचभाई आदी यावेळी उपस्थित होते.
आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शहरातील नागनदीसह सर्व सांडपाणी वाहून नेणारे नाले तुंबणार नाहीत, यासाठी साफसफाईची कामे सुरू करण्यात यावी. आरोग्य विभागाने स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे व साथीचे आजार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. कोराना विषाणूच्या प्रसाराबाबत सर्तकता बाळगताना जनतेमध्ये जागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अलगीकरण करून वाढत असलेल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही व किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

महाराजबागसाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर करा
‘लॉकडाऊन’मुळे महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद आहे. येथील प्राण्यांच्या सुरक्षा व आरोग्यासाठी तसेच त्यांची सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनुदानाची निकड आहे. याबाबतचा प्रस्ताव पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. येथील प्राण्यांसाठी ‘दत्तक योजना’ राबविण्यात येत असून यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे पंचभाई यांनी सांगितले.

Web Title: Start all industries in industrial estates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.