लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरल ...
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात ज्या भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झाले नाही त्या भागात पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करणार आहेत. ...
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या रुग्णालयात सरासरी १ हजार ३२० बेड असलेले ‘कोविड हेल्थ सेंटर’ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १०२९ जणांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. १००५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. तर ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. ...
अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले. ...
सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले. ...
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...