नागपुरातील महाल येथील तीन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:13 PM2020-05-26T21:13:59+5:302020-05-26T21:16:18+5:30

महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Three shops at Mahal in Nagpur caught fire | नागपुरातील महाल येथील तीन दुकानांना आग

नागपुरातील महाल येथील तीन दुकानांना आग

Next
ठळक मुद्देफूटवेअरच्या दुकानांचे लाखोचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीत शेख फूटवेअर, शाहनवाज फूटवेअर व नॉव्हेल्टी आॅप्टिकल या दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सिव्हील लाईन, गंजीपेठ व कॉटन मार्केट या केंद्रावरील तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु तोपर्यंत दुकानातील बराचसा माल जळून खाक झाला होता. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण होते. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत दोन लाखाचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाचे अधिकारी ए. बी.गोडे व बरडे यांचे नेतृत्वात विभागाच्या जवानांनी सव्वा तासात ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Web Title: Three shops at Mahal in Nagpur caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.