नागपुरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये वाढतेय एका माकडाचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 08:09 PM2020-05-26T20:09:29+5:302020-05-26T20:10:59+5:30

येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्हिडीओ दाखवून त्याच्यात ‘माकडपण’ रुजवत आहेत.

A baby monkey grows up in a transit center in Nagpur | नागपुरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये वाढतेय एका माकडाचे बाळ

नागपुरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये वाढतेय एका माकडाचे बाळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्हिडीओ दाखवून त्याच्यात ‘माकडपण’ रुजवत आहेत.
८ मे रोजी म्हणजे मदर्स डे च्या दोन दिवसापूर्वी हिंगणा रेंजमधून येथील वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने एका माकडीणीला तिच्या बाळासह रेस्क्यू करून आणले. हिंगणा परिसरात एका घरामध्ये घुसल्याची स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे या मायलेकांना रेस्क्यू क रून आणण्यात आले होते. दोन दिवस त्यांचा येथे मुक्काम होता. या काळात आई त्याला जवळ घेऊन दुधही देत होती. त्यांना कसलाही आजार व दुखापत नसल्याने दोन दिवसानी म्हणजे १० मे रोजी जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चमू या मायलेकांना जंगलात सोडायला गेली असता वेगळेच घडले. आईने पिलाला न नेता जंगलात धूम ठोकली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. काही वेळाने ती परत येऊन बाळाला घेऊन जाईल, असे वाटल्याने वाट पाहिली. मात्र दोन तासानंतरही ती परत न आल्याने अखेर त्या पिलाला ट्रान्झिट सेंटरला आणण्यात आले.
आईपासून ताटातूट झालेले हे पिलू दोन दिवस हिरमुसले होते. मात्र त्याला येथील कर्मचाऱ्यांनी आईसारखी वागणूक देणे व खेळविणे सुरू केले. आता त्याची आईसारखी काळजी घेण्यात येत आहे. जंगलात आईकडून पिल्लू जे शिकतो ते शिकविण्यासाठी त्याला माकडांचे वेगवेगळे व्हिडीओ दाखविणे सुरू आहे. त्यातील आवाज ऐकून आणि हालचाली बघून तो प्रतिसादही देत आहे. साधारणत: माकडाच्या भावना माणसारख्या असतात. तो संवेदनशीलही असतो. मात्र पिलाला सोडून आई निघून गेल्याची ही घटना विरळच मानली जात आहे.

व्हिडिओ बघताना पिल्लाचे हावभाव बघण्यासारखे असतात. त्याच्या सर्व क्रीडा माणसाच्या लहान बाळासारख्या आहेत. आईला चिटकून बसावा तसा तो येथील लोकांच्या अंगाला चिटकून बसतो. त्याला मोठे करण्यात यश यायला हवे. आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत.

कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: A baby monkey grows up in a transit center in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.