कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. ...
कपिलननगर पोलीस ठाणे परिसरात रमी क्लबच्या नावावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरूनच उत्तर नागपूर आणि कामठीतील गुंड गुन्हेगारी धंदे चालवीत होते. कुख्यात लकी खानवर फायरिंग करणारे गुन्हेगार या अड्ड्याचे सूत्रधार आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदाराची ७२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करणारा आरोपी रमेश पुंड याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच, त्याला तात्काळ अटक करण्याचा पोलिसांना आदेश दिला. ...
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी ...
बारच्या मॅनेजरची हत्या करण्यास आलेल्या आरोपींना बारमध्ये गर्दी दिसल्याने, आरोपींचा प्लॅन फेल झाला. परंतु बारमध्ये त्यांनी चांगलीच तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका येथे घडली. पोलिसांनी दोन तासात आरोपीसह त्याच्या ५ अल्पवयीन साथीदारांना पकडल ...
शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ...
'जगात सांस्कृतिक शांतता स्थापित करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा मार्गदर्शन करणार आहेत. ...
वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात ...