नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरात नोकरीच्या मागे न लागता शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याचे सार्थक व्हावे व मी शेतकऱ्यांसाठी काही देणं लागतो या उद्देशाने त्याने कोतेवाडा येथे प्रकल्प उभारला. ...
बाहेर असताना लघुशंका आली व वेळेवर टॉयलेट न मिळाल्यास ते खरच त्रासदायक ठरते. यावर नागपूरकर टीमने एक उपाय शोधला आहे. टॉयलेटचा पत्ता सांगणारा 'क्विक पी' हा मोबाईल अॅप त्यांनी तयार केला आहे, जो तुम्हाला खरच मदतीचा ठरू शकतो. ...
नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल. ...
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. ...
रविवारी पहाटे ३ च्या सुमारास संत्रा भरून जात असलेली भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...