भाजपा आमदार कीर्तिकुमार भांगडियांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 22:06 IST2020-12-28T22:05:47+5:302020-12-28T22:06:44+5:30
खोटी माहिती देऊन सदनिका मिळविल्याचा आरोप

भाजपा आमदार कीर्तिकुमार भांगडियांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळविल्यामुळे चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने इमामवाडा व सक्करदरा पोलिसांना यांसदर्भात आदेश दिला आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्यासही बजावले.
बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळवल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे, आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.